टाटांचे प्रकल्प नागपूरमध्ये होण्यासाठी गडकरी होते आग्रही ; टाटा सन्सच्या अध्यक्षांना लिहिले होते पत्र

टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातने पळवल्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर टाटांचा प्रकल्प नागपूरमध्येच व्हावा यासाठी...
टाटांचे प्रकल्प नागपूरमध्ये होण्यासाठी गडकरी होते आग्रही ; टाटा सन्सच्या अध्यक्षांना लिहिले होते पत्र

वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातने पळवल्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर टाटांचा प्रकल्प नागपूरमध्येच व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आग्रही असल्याचे दिसून आले आहे. गडकरी यांनी नागपूरला टाटा समुहाचे हब बनवण्याची विनंती करणारे पत्र टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांना लिहिले आहे.

टाटा सन्सच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात गडकरींनी म्हटले आहे की, टाटा समुहाच्या विविध उद्योग आणि व्यापाराच्या अनुषंगाने नागपूरच्या मिहानमध्ये एसईझेड आणि नॉन एसईझेड अशा दोन्ही प्रकारचे जमिनी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यामुळे टाटा समुहाच्या विविध उद्योगांसाठी मोठे गोदाम या ठिकाणी तयार करता येणार आहे.

नागपूरच्या मिहानमध्ये एअर इंडियाचे विमानांसाठीचे एमआरओ असून टाटा समुह भविष्यातील व्यापार विस्ताराच्या संधीकडे पाहून मिहानमध्ये आणखी एमआरओ उभारू शकतो. तसेच स्वत:च्या एअरलाईन्ससाठी आणि इतर एअरलाईन्ससाठी स्पेअर पार्टचे मोठे गोदाम उभारू शकतो, असेही गडकरी यांनी पत्रात नमूद केले आहे. मात्र, या पत्रात गडकरी यांनी कुठेही एअरबससोबत टाटाच्या प्रकल्पाबद्दल भाष्य केले नव्हते किंवा तो प्रकल्प नागपुरात येत आहे किंवा टाटांनी तो प्रकल्प नागपुरात आणावा, असे नमूद केले नव्हते ही बाब विशेष आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in