
भोंदू अध्यात्मिकगुरू आसाराम बापूला २०१३ मधील एका बलात्कार प्रकरणात गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले आहे. मंगळवारी न्यायालय आसाराम बापूला शिक्षा सुनावणार आहे. सूरतमधील एका तरुणीवर २०१३ मध्ये बलात्कार केल्याचा आसाराम बापूवर आरोप होता. तर, या पीडित तरुणीच्या बहिणीवर आसारामचा मुलगा साई नारायण याने बलात्कार केल्याचा आरोप होता. याप्रकरणात आसारामशिवाय,त्याचीपत्नी लक्ष्मी,मुलगी भारती आणि चार अनुयायी ध्रुवबेन,निर्मला,जस्सीआणि मीरा हे आरोपी होते. याप्रकरणाच्या सुनावणीसाठी आसाराम बापूला कोर्टात व्हर्च्युअली हजर करण्यात आले. सुनावणीनंतर कोर्टाने आसारामला दोषी ठरवले आहे. आधीच एका बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापू हा जोधपूरच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सूरत बलात्कार प्रकरणात आसारामबापूच्या पत्नीसह इतर सहाआरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.