हिवाळ्यासाठी गंगोत्री मंदिर बंद

उत्तरकाशी येथील प्रसिद्ध गंगोत्री मंदिराचे दरवाजे मंगळवारी हिवाळ्यानिमित्त बंद करण्यात आले.
हिवाळ्यासाठी गंगोत्री मंदिर बंद
हिवाळ्यासाठी गंगोत्री मंदिर बंदX
Published on: 

उत्तरकाशी: येथील प्रसिद्ध गंगोत्री मंदिराचे दरवाजे मंगळवारी हिवाळ्यानिमित्त बंद करण्यात आले. यावेळी देवी गंगेची उत्सवमूर्ती असलेली पालखी तिच्या हिवाळी निवासस्थान असलेल्या मुखीमठकडे रवाना झाली. बुधवारी सकाळी ही पालखी मुखबा गावात पोहोचणार असून, पुढील सहा महिने भाविकांना येथे देवी गंगेचे दर्शन घेऊन तिचे आशीर्वाद घेता येणार आहेत.

मंदिराचे दरवाजे बंद करण्याची तयारी सकाळपासूनच सुरू झाली होती. भाविकांना देवीचे दर्शन घेण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर दुपारी ठीक १२ वाजून ५ मिनिटांनी मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद करण्यात आले. यावेळी पुजाऱ्यांनी विशेष पूजा-अर्चा केली.