नवी दिल्ली : कुख्यात आणि मोस्ट वॉन्टेड गुंड मनपाल बादली याला हरयाणआ पोलिसांच्या विशेष कृती दलाने कंबोडियामध्ये अटक करून भारतात आणले आहे. मनपाल बादलीवर ७ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. जवळपास १० दिवसांपूर्वी गुंड मनपाल बादलीला कंबोडियात ताब्यात घेण्यात आले होते.
मनपाल बादली २९ ऑगस्ट २०१८ रोजी तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर तो परदेशात गेला आणि त्याची टोळी चालवत होता.
मनपालवर खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तुरुंगात असतानाही मनपालवर खून केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला मनपाल ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम शिकत होता, परंतु २००० मध्ये त्याच्या काकांच्या हत्येनंतर तो गुन्हेगारीच्या जगात आला. मनपाल बादली हा हरयाणा पोलिसांच्या यादीत नंबर-१ मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे.