राष्ट्रीय
दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांचा एन्काऊंटर; दोन शूटर ठार
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या बरेली येथील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात सामील असलेले गोल्डी ब्रार टोळीचे दोन गुंड बुधवारी गाझियाबादच्या ट्रोनिका सिटी परिसरात झालेल्या चकमकीत ठार झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या बरेली येथील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात सामील असलेले गोल्डी ब्रार टोळीचे दोन गुंड बुधवारी गाझियाबादच्या ट्रोनिका सिटी परिसरात झालेल्या चकमकीत ठार झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल, उत्तर प्रदेश एसटीएफ आणि हरियाणा एसटीएफ यांच्या संयुक्त कारवाईत या गुंडांना टिपण्यात आले. मृत आरोपींची नावे रविंद्र व अरुण अशी आहेत. हे दोघे गुंड कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रार व रोहित गोदारा टोळीचे होते.