२८ लाख रुपयांचा गांजा जप्त, दोघांना अटक

ओदिशातून मंगळुरू आणि केरळला नेला जाणारा १२० किलो गांजा केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
२८ लाख रुपयांचा गांजा जप्त, दोघांना अटक

मंगळुरू : ओदिशातून मंगळुरू आणि केरळला नेला जाणारा १२० किलो गांजा केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघे जण वायनाड व कन्नूर येथील असून त्यांची नावे एम. एस. अनूप (२८) आणि के. व्ही. लतीफ (३६) अशी आहेत. माहितीच्या आधारे केंद्रीय गुन्हे शाखेचे निरीक्षक श्याम सुंदर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी कर्नाटक-केरळ सीमेवर तळपाडी येथील पिलिकूर येथे छापा टाकला आणि या दोघांना अटक केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. जप्त केलेल्या गांजाची किंमत २८ लाख रुपये आहे. तसेच त्यांच्याकडून तीन मोबाईल फोन, ४०२० रुपये रोख आणि एक जीपही जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ३,५१,४५२० रुपये आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in