धक्कादायक! चिमुकल्यांनी बागेतील फुले तोडली, मालकिणीने रागात अंगणवाडी शिक्षिकेचे नाकच कापले

सुगंधा मोरे (वय ५०) असे जखमी महिलेचे नाव असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी फरार आरोपी कल्याणी मोरेचा शोध सुरू केला आहे.
धक्कादायक! चिमुकल्यांनी बागेतील फुले तोडली, मालकिणीने रागात अंगणवाडी शिक्षिकेचे नाकच कापले

बेळगाव : कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात एका बागेच्या मालकिणीने बालसंगोपन केंद्रातील मुलांनी परवानगी न घेता फुले काढल्यामुळे त्या केंद्रातील कर्मचारी महिलेचे थेट नाक कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बासुर्ते गावात घडली. सुगंधा मोरे (वय ५०) असे जखमी महिलेचे नाव असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

मुले बागेत शिरताच कल्याणी मोरेचा संताप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या अंगणवाडी बालसंगोपन केंद्रातील मुलांनी बागेत घुसून फुले काढल्याने आरोपी कल्याणी मोरे संतापली.

शिवीगाळ करून मारहाण-

कल्याणी मोरे यांनी सुगंधा मोरे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पोलिसांचे म्हणणे आहे की, दोघांमधील वाद वाढल्यावर कल्याणीने सुगंधाच्या नाकावर विळ्याने हल्ला केला, त्यामुळे तिचे नाक कापले गेले.

आयुष्याशी झुंज-

सुगंधाच्या फुफ्फुसात रक्त शिरले होते आणि आता ती मृत्यूशी झुंज देत आहे, असे पोलिसांनी सांगितले. १ जानेवारी रोजी घडलेली ही घटना नुकतीच उघडकीस आली आहे. काकठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in