गौतम अदानी यांची तिसऱ्या स्थानावर घसरण

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्यापेक्षा तो फार कमी फरकाने पुढे आहेत.
गौतम अदानी यांची तिसऱ्या स्थानावर घसरण

ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकासाठी गौतम अदानी, जेफ बेझोस आणि लुई व्हिटॉनचे प्रमुख बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्यात अलीकडच्या काळात चुरशीची लढत झाली आहे. दरम्यान, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती २४५ अब्ज डॉलर (सुमारे १९.९३ लाख कोटी रुपये) आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठ्या घसरणीनंतर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस पुन्हा एकदा जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्यापेक्षा तो फार कमी फरकाने पुढे आहेत.

अब्जाधीशांच्या टॉप १० यादीतून मुकेश अंबानी बाहेर

दुसरीकडे, भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी जगातील अब्जाधीशांच्या टॉप १० यादीतून बाहेर पडले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, मुकेश अंबानी ८२.४ अब्ज डॉलर्स (६.७० लाख कोटी रुपये) संपत्तीसह यादीत ११ व्या स्थानावर आहेत.

अदानी यांच्या संपत्तीत ६.९ अब्ज डॉलरची घट

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या दैनंदिन रँकिंगनुसार, मंगळवारी सकाळी ११.३० वाजता गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १३५ अब्ज डॉलर्स किंवा सुमारे १०.९८ लाख कोटी रुपये आहे. जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती १३८ अब्ज डॉलर्स (सुमारे ११.२३ लाख कोटी) आहे. मंगळवारी, गौतम अदानी यांच्या संपत्तीत सुमारे ६.९ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे, तर बेझोसच्या संपत्तीत १.३६ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in