Gautam Adani: भाजपच्या विजयानंतर गौतम अदानींच्या संपत्तीत वाढ ; कंपन्यांच्या शेअर्स १५ टक्क्यांनी वाढले

भाजपच्या विजयाचा परिणाम सोमवारी शेअर बाजारात तेजीच्या रूपाने दिसून आला आहे
Gautam Adani: भाजपच्या विजयानंतर गौतम अदानींच्या संपत्तीत वाढ ; कंपन्यांच्या शेअर्स १५ टक्क्यांनी वाढले

काल चार राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत. यात चारपैकी तीन राज्यात भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. काल भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विजय प्राप्त केला होता. भाजपच्या विजयाचा परिणाम सोमवारी शेअर बाजारात तेजीच्या रूपाने दिसून आला आहे. दरम्यान, सर्वात मोठी वाढ अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली दिसून येत आहेत.

गौतम अदानी याच्या कंपनीचे शेअर्स तब्बल 15 टक्क्यांनी वाढले आहेत. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या चांगल्या कामगिरीमुळे मागील आठवड्यामध्ये गौतम अदानी यांच्या संपत्तीत तब्बल 46663 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसंच हिंडेनबर्गच्या आरोपांच्या चौकशीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गौतम अदानी यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली होती. गौतम अदानी यांच्या संपत्तीत अवघ्या एका आठवड्यात तब्बल 5.6 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी परत होताना दिसून येतं आहे. तसंच देशी गुंतवणूकदारांबरोबरच विदेशी गुंतवणूकदारही अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अलीकडेच, राजीव जैन यांच्या GQG भागीदार आणि कतार गुंतवणूक प्राधिकरणाने गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in