अंबानींना मागे टाकत अदानी पुन्हा श्रीमंतांच्या यादीत अव्वल

गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाने मुकेश अंबानी यांना मागे टाकत पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा दर्जा मिळवला आहे. हुरुन रिपोर्टनुसार, अदानी यांची संपत्ती १३ टक्क्यांनी वाढून ₹ ९.२३ लाख कोटी (९६ अब्ज डाॅलर) झाली आहे.
अंबानींना मागे टाकत अदानी पुन्हा श्रीमंतांच्या यादीत अव्वल
अंबानींना मागे टाकत अदानी पुन्हा श्रीमंतांच्या यादीत अव्वल
Published on

नवी दिल्ली : गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाने मुकेश अंबानी यांना मागे टाकत पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा दर्जा मिळवला आहे. हुरुन रिपोर्टनुसार, अदानी यांची संपत्ती १३ टक्क्यांनी वाढून ₹ ९.२३ लाख कोटी (९६ अब्ज डाॅलर) झाली आहे. तर मुकेश अंबानी यांची संपत्ती १० टक्क्यांनी घटून ₹८.६३ लाख कोटी झाली आहे. दोन्ही उद्योजकांच्या संपत्तीत सध्या ₹ ५९,४०० कोटींचा फरक आहे. गेल्या पाच वर्षांत पहिल्या दोन स्थानांमध्ये पाच वेळा बदल झाला आहे. २०२२ मध्ये अदानी अव्वल आले. २०२३ मध्ये अंबानींनी ते स्थान परत मिळवले. २०२४ मध्ये पुन्हा अदानी, २०२५ मध्ये अंबानी, २०२६ मध्ये पुन्हा अदानी यांनी अव्वल स्थान पटकावले आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती :

  • गौतम अदानी व कुटुंब (संपत्ती : ₹ ९.२३ लाख कोटी)

  • मुकेश अंबानी व कुटुंब (संपत्ती : ₹ ८.६३ लाख कोटी)

एकूण अब्जाधीश : ३९१ (विक्रमी संख्या)

एकूण श्रीमंत व्यक्ती : १,८१० (₹ १,००० कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेले)

एकूण एकत्रित संपत्ती : ₹१८७.५ लाख कोटी (१.९६ ट्रिलियन डाॅलर)

सर्वात श्रीमंत महिला : रोशनी नाडर मल्होत्रा व कुटुंब (₹ २.७९ लाख कोटी)

प्रमुख आर्थिक केंद्र : मुंबई (४६५ अब्जाधीश / श्रीमंत व्यक्ती)

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in