तिमाही जीडीपी दर पूर्णपणे गूढ आहे, समजणे कठीण; माजी ‘सीईए’ अरविंद सुब्रमण्यन यांचे मत

भारताच्या अर्थ मंत्रालयाने नुकताच जाहीर केलेला जीडीपी वृद्धी दर हा ‘पूर्णपणे गूढ’ आहे आणि समजणे कठीण आहे...
तिमाही जीडीपी दर पूर्णपणे गूढ आहे, समजणे कठीण; माजी ‘सीईए’ अरविंद सुब्रमण्यन यांचे मत
(संग्रहित छायाचित्र, PTI)

नवी दिल्ली : भारताच्या अर्थ मंत्रालयाने नुकताच जाहीर केलेला जीडीपी वृद्धी दर हा ‘पूर्णपणे गूढ’ आहे आणि समजणे कठीण आहे, असे मत माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात व्यक्त केले.

भारताची अर्थव्यवस्था २०२३ च्या शेवटच्या तीन महिन्यांत अपेक्षेपेक्षा चांगली म्हणजे ८.४ टक्क्यांनी वाढली. तसेच गेल्या दीड वर्षातील वाढीची गती सर्वात वेगवान राहिली. यासंदर्भात ते म्हणाले की, मला तुमच्याशी प्रामाणिकपणे सांगायचे आहे की नवीनतम जीडीपी आकडेवारी मला समजू शकली नाही.

सुब्रमण्यन पुढे म्हणाले, मी ते आदराने सांगतो. हे आकडे पूर्णपणे गूढ आहेत. त्यांचा मेळ लागत नाहीत. मला त्यांचा अर्थ काय आहे, ते माहीत नाही. ‘एनएसओ’ अर्थात राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीसाठी जीडीपी अंदाज देखील ७.८ टक्के आणि ७.६ टक्क्यांवरून अनुक्रमे ८.२ टक्के आणि ८.१ टक्के केला आहे. या आकड्यांमध्ये निहित महागाई १ ते १.५ टक्के असली तरी अर्थव्यवस्थेतील वास्तविक चलनवाढ ३ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. खासगी क्षेत्रात उपभोग वस्तूंची विक्री ३ टक्के असली तरीही अर्थव्यवस्था साडेसात टक्क्यांनी वाढत असल्याचे दाखविण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ताज्या आकडेवारीबाबत सुब्रमण्यन म्हणाले की, चुका आणि वगळणे, ज्याचा लेखाजोखा नाही, आर्थिक वर्ष २०२४ साठी अंदाजे ७.६ टक्के वाढीपैकी ४.३ टक्के गुण आहेत. त्यामुळे तुम्हाला माहीत असलेल्या आकडेवारीबद्दल बरीच सामग्री आहे, मला समजत नाही. मी असे म्हणत नाही की, हे चुकीचे आहेत. ते इतरांनी तपासून पाहायचे आहे, असे माजी सीईए म्हणाले.

थेट विदेशी गुंतवणुकीत थोडीशी घसरण

सुब्रमण्यन यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही तिमाहीत आणि गेल्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था गुंतवणुकीसाठी खूप चांगले केंद्र बनले आहे अशी चर्चा असताना, ती प्रत्यक्षात खूप झपाट्याने घसरली आहे. तुम्ही थेट विदेशी गुंतवणुकीत थोडीशी घसरण झाल्याचे पाहू शकता. माजी सीईए यांना आश्चर्य वाटले की, जर भारत इतके आकर्षक ठिकाण बनले आहे, तर तेथे थेट परदेशी गुंतवणूक आणखी का झाली नाही? खासगी गुंतवणूक, कॉर्पोरेट गुंतवणूक २०१६ मधील पातळीपेक्षा खूपच खाली आहे, असेही सुब्रमण्यम यांनी निदर्शनास आणले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in