भारतातील ‘जेन झी’चा कल क्रिप्टो क्षेत्राकडे अधिक; गुंतवणुकीचा पहिला टप्पा ठरतोय ‘क्रिप्टो’; वझीरएक्सच्या अहवालातील निष्कर्ष

भारतातील ‘जेन झी’ (युवा पिढी) आता अगदी लहान वयातच आर्थिक बाजारपेठेत प्रवेश करत आहे आणि गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी ‘क्रिप्टोकरन्सी’चा एक मुख्य पर्याय म्हणून वापर करत आहे.
भारतातील ‘जेन झी’चा कल क्रिप्टो क्षेत्राकडे अधिक; गुंतवणुकीचा पहिला टप्पा ठरतोय ‘क्रिप्टो’; वझीरएक्सच्या अहवालातील निष्कर्ष
भारतातील ‘जेन झी’चा कल क्रिप्टो क्षेत्राकडे अधिक; गुंतवणुकीचा पहिला टप्पा ठरतोय ‘क्रिप्टो’; वझीरएक्सच्या अहवालातील निष्कर्ष'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी दिल्ली : भारतातील ‘जेन झी’ (युवा पिढी) आता अगदी लहान वयातच आर्थिक बाजारपेठेत प्रवेश करत आहे आणि गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी ‘क्रिप्टोकरन्सी’चा एक मुख्य पर्याय म्हणून वापर करत आहे. बाजारातील चढ-उतारांदरम्यानही टिकून राहणे आणि गुंतवणुकीत विविधता ठेवणे याला हे तरुण प्राधान्य देत असल्याचे ‘वझीरएक्स’ या क्रिप्टो एक्सचेंजच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

वझीरएक्सच्या अहवालानुसार, प्लॅटफॉर्मवरील ४४.४ टक्के तरुण गुंतवणूकदारांनी त्यांच्या आर्थिक प्रवासाची सुरुवात थेट क्रिप्टोमधूनच केली आहे. यावरून स्पष्ट होते की, ही युवा पिढी आधीच्या पारंपरिक गुंतवणुकीत क्रिप्टो जोडण्याऐवजी डिजिटल ॲसेट्सद्वारेच थेट बाजारात पाऊल टाकत आहे.

लहान शहरांमधून क्रिप्टोला मोठी पसंती

हा कल केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. वझीरएक्स वापरणाऱ्या ‘जेन झी’ गुंतवणूकदारांपैकी जवळपास ८० टक्के युजर्स देशातील टॉप १० शहरांव्यतिरिक्त (टियर-२ आणि टियर-३) शहरांमधील आहेत. मुंबई आणि दिल्लीमध्ये आजही सर्वाधिक वैयक्तिक युजर्स असले, तरी लहान शहरांमधील सहभाग झपाट्याने वाढत आहे.

जेन झी हे सिद्ध करत आहे की, संपत्ती निर्माण करणे तुम्ही कुठून आला आहात किंवा किती पैशांनी सुरुवात करता यावर अवलंबून नाही; तर योग्य संधी शोधणे, अभ्यास करणे आणि लवकरात लवकर सुरुवात करणे यावर अवलंबून आहे. भारतीय तरुण आधीपासूनच क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करत होते. पण आता ते अधिक शिस्त, उत्सुकता आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून हे करत आहेत. हीच भारताच्या पुढील आर्थिक क्रांतीची पायाभरणी आहे, असे निश्चल शेट्टी, संस्थापक, वझीरएक्स यांनी सांगितले.

क्रिप्टो कल

  • विद्यार्थी - ४०%

  • व्यावसायिक/नोकरदार - ३३%

  • स्वयंरोजगार - २७%

क्रिप्टोने सुरुवात करणारे तरुण : ४४.४%

सरासरी वय : २५ वर्षे

२०२६ च्या पहिल्या सहामाहीतील नवीन ग्राहक : ७२% जेन झी

सक्रिय ट्रेडर्स : ३२.१% जेन झी

मेट्रो शहराबाहेरील (टियर-२ व ३) वापरकर्ते : ८०%

उत्पन्न गट (वार्षिक रु. १ ते ५ लाख) : ७९.६%

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in