जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवारी भारताचे नवीन लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. जनरल द्विवेदी हे भारताचे ३० वे लष्करप्रमुख आहेत.
जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला
X | ANI

नवी दिल्ली : जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवारी भारताचे नवीन लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. जनरल द्विवेदी हे भारताचे ३० वे लष्करप्रमुख आहेत. यावर्षी १९ फेब्रुवारी रोजी ते लष्कराचे उपप्रमुख झाले होते. लष्करप्रमुख झाल्यावर द्विवेदी यांना लेफ्टनंट जनरलवरून जनरल पदावर बढती देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने ११ जूनच्या रात्री त्यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली होती. यापूर्वी लष्कराचे उपप्रमुख, नॉर्दर्न आर्मी कमांडर, डीजी इन्फंट्री आणि लष्करातील इतर अनेक कमांडचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे.

जनरल मनोज पांडे यांना लष्कराकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’

जनरल मनोज पांडे यांच्या जागी जनरल द्विवेदी यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जनरल मनोज पांडे हे रविवारीच निवृत्त झाले आहेत. कामकाजाच्या शेवटच्या दिवशी त्यांना लष्कराकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला. ते २६ महिने लष्करप्रमुख पदावर कार्यरत होते.

logo
marathi.freepressjournal.in