Ghaziabad: हॉटेल रेडिसन ब्लू, १०० कोटींचे कर्ज आणि... ; वाचा संपूर्ण प्रकरण...

गाझियाबादचे (Ghaziabad) पंचतारांकित हॉटेल रेडिसन ब्लूचे मालक अमित जैन यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आणि सर्वांना धक्काच बसला.
Ghaziabad: हॉटेल रेडिसन ब्लू, १०० कोटींचे कर्ज आणि... ; वाचा संपूर्ण प्रकरण...

प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल रेडिसन ब्लूचे (Ghaziabad) मालक अमित जैन यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आणि एकच खळबळ उडाली. ते गाझियाबादमधील हॉटेल रेडिसन ब्लूचे मालक होते. आत्महत्येची माहिती दिल्लीच्या मांडवली पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर आता पोलिस त्यांच्या मृत्यूची कसून चौकशी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अमित जैन यांच्यावर बँकेच्या कर्जाचा भार होता. त्यांनी कोविडदरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शंभर कोटींचे कर्ज घेतले होते. परंतु आता ते कर्ज फेडण्यास असमर्थ होते. यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडे आठच्या सुमारास अमित नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. त्यांनी भावाला गाझियाबाद येथील कार्यालयात सोडले. नंतर मीटिंगला जातो, असे सांगून तेथून निघाले. दुपारी त्यांचा मुलगा आदित्य काही सामान घेण्यासाठी खेळगाव येथे असणाऱ्या फ्लॅटवर पोहोचला. तेव्हा त्याने पोलिसांना फोन करून वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती कळवली. कोरोना काळात हॉटेल व्यवसाय अतिशय मंदीत होता. अशा काळात घेतलेल्या कर्जाचे हफ्ते कसे फेडायचे? घेतलेल्या कर्जाजी मुद्दल कशी फेडायची? असं असताना व्याज तर वाढत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून याच १०० कोटींच्या परताव्याची चिंता अमित जैन यांना सतावत होती. असे असतानाही कुटुंबामध्ये त्यांनी कोणालाच काही कळू दिले नाही., असे सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in