गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसची ऑफर नाकारली

गुलाम नबी आझाद यांची नाराजी म्हणजे त्यांच्या शिफारशींकडे केले जाणारे दुर्लक्ष आहे
गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसची ऑफर नाकारली

काँग्रेसने मंगळवारी पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची राज्य प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली, मात्र अवघ्या दोन तासांतच आझाद यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आझाद यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांनी प्रकृती कारणास्तव नवीन जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याचे समजते.

गुलाम नबी आझाद यांची नाराजी म्हणजे त्यांच्या शिफारशींकडे केले जाणारे दुर्लक्ष आहे, त्यामुळे त्यांनी नवीन जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी ही माहिती हायकमांडला दिली आहे. नवी जबाबदारी दिल्याबद्दल आझाद यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानले आहेत. गुलाम नबी आझाद यांना यावर्षी केंद्राकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in