तरुणीवर बलात्कार करणाऱ्या मैत्रिणीच्या बापाला अटक

अश्लील फोटो अपलोड केल्याप्रकरणी अटक केल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले.
तरुणीवर बलात्कार करणाऱ्या मैत्रिणीच्या बापाला अटक

जाजपूर : ओदिशातील जाजपूर जिल्ह्यात एका ५४ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी त्याच्या मुलीच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर तिचे अश्लील फोटो अपलोड केल्याप्रकरणी अटक केल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले.

२३ वर्षीय तरुणीने पानीकोईली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी हा तिच्या मैत्रिणीचा बाप आहे. ती अनेकवेळा मैत्रिणीच्या घरी गेली असल्याने आरोपी तिच्या ओळखीचा होता. मागच्या वर्षी मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी गेले तेव्हा ती व तिची आई घरी नव्हती. तिचे वडील एकटेच घरी होते. त्यांनी मला सांगितले की ती बाहेरगावी गेली आहे आणि काही वेळाने परत येईल, म्हणून मी तिला भेटण्यासाठी घरात थांबले तेव्हा त्यांनी परिस्थितीचा गैरफायदा घेत माझ्यावर लैंगिक अत्याचार केले, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in