
पुढील वर्षी मंदी येण्याची भीती जगभरातील आघाडीच्या कंपन्यांच्या १३०० चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स अर्थात सीईओ यांच्यापैकी ८६ टक्के जणांनी व्यक्त केली आहे. तथापि, ५८ टक्के सीईओंनी मंदी तीव्र नसेल आणि अल्पकाळासाठी असेल, असेही आपले मत मांडले आहे.
१४ टक्के वरिष्ठ सीईओंनी सध्या २०२२ मध्ये मंदीची सुरुवात (९ टक्के) झाली असून महामाारीच्या काळात ती १५ टक्के होती, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
‘केपीएमजी २०२२ सीईओ आऊटलुक’ या नावाने हा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात सीईओंना त्यांचे धोरण आणि ते या स्थितीकडे कसे पाहतात याबाबत प्रश्र्न विचारण्यात आले होते. पुढील वर्षी १० पैकी ८ (८६ टक्के) सीईओंनी मंदी येईल, असे स्पष्ट केले असून ७१ टक्के सीईओंनी कंपनीच्या महसुलावर १० टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
बहुतांश वरिष्ठ सीईओंच्या मते व्यापार वृद्धीवर (७३ टक्के) परिणाम होईल. तथापि, एकतृतीयांश म्हणजे ७६ टक्के सीईओ म्हणाले की, आगामी मंदीची चाहूल लागली असल्याने आम्ही सावधगिरीच्या उपाययोजना केल्या आहेत.