ज्यात सध्या सोन्याची तस्करी वाढतचं चालली आहे. अशातचं आता गोवा विमानतळांवर याचं बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. गोव्यातील मोपा विमानतळावर 28 आयफोन आणि तब्बल चार कोटींचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. गोव्यातील डीआरआय विभागानं गोव्याच्या मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमातळावर मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणांत तीन प्रवाशांना अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रवाशांच्या बॅगमध्ये आयफोन आणि सोनं आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारवाईत तीन प्रवाशांकडून सुमारे 3 कोटी 92 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डीआरआय अधिकाऱ्यांनी चेक-इन केलेल्या बॅगमध्ये एका पॅकेटमध्ये आयफोन गुंडाळलेले सापडले. तर, एका प्रवाशाच्या कमरेकडे सोन्याची पेस्ट लपवून ठेवली होती.
तीनही प्रवाशांना पोलिसांनी अटक केली आहे. बेकायदेशीररित्या सात किलो सोन्याची पेस्ट आणि आयफोनची तस्करीकेल्याप्रकरणी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण मुंबई आणि दुबई दरम्यान कार्यरत असलेल्या सोन्याच्या तस्करी रॅकेटचा एक भाग असल्याचा डीआरआयला दाट संशय असल्याने या तस्करांची कसून चौकशी केली जातं आहे.