गोवा नाईटक्लब आग प्रकरण : लुथ्रा बंधूंना जामीन मंजूर; कारावासातून सुटका होणार

गोव्यातील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या आगीच्या घटनेत भस्मसात झालेल्या नाईटक्लबचे मालक सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा यांना बुधवारी गोवा न्यायालयाने बनावट कागदपत्रे प्रकरणात जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे त्यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गोवा नाईटक्लब आग प्रकरण : लुथ्रा बंधूंना जामीन मंजूर; कारावासातून सुटका होणार
गोवा नाईटक्लब आग प्रकरण : लुथ्रा बंधूंना जामीन मंजूर; कारावासातून सुटका होणार
Published on

पणजी : गोव्यातील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या आगीच्या घटनेत भस्मसात झालेल्या नाईटक्लबचे मालक सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा यांना बुधवारी गोवा न्यायालयाने बनावट कागदपत्रे प्रकरणात जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे त्यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या भीषण आगीच्या प्रकरणात त्यांना यापूर्वीच जामीन मिळाला होता.

लुथ्रा बंधूंचे वकील पराग राव यांनी पत्रकारांना माहिती दिली की, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (म्हापसा) ज्युड सिक्वेरा यांनी आरोपींना नियमित जामीन मंजूर केला आहे.

प्रकरण काय

उत्तर गोव्यातील अरपोरा येथील नाईटक्लब चालवण्यासाठी उत्पादन शुल्क परवाना आणि इतर परवानग्या मिळवण्यासाठी लुथ्रा बंधूंनी बनावट ना-हरकत प्रमाणपत्र वापरल्याचा आरोप आहे. या बनावट एनओसीचा वापर नियामक विभागाकडून मंजुरी मिळवण्यासाठी करण्यात आला होता.

logo
marathi.freepressjournal.in