Goa Nightclub Fire Update : गोवा नाइट क्लबप्रकरणी ED कडून तपासाला वेग; गोवा, नवी दिल्ली, गुरुग्राममधील ९ ठिकाणी छापे

गोव्यातील नाइट क्लब प्रकरणाशी संबंधित सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गोवा, नवी दिल्ली आणि गुरुग्राम येथील नऊ ठिकाणी छापे टाकून तपास करण्यात आला. या कारवाईत अर्पोरा-नागोआ पंचायतचे सरपंच व सचिव यांच्या कार्यालय/निवासस्थानांचाही समावेश असल्याची माहिती एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.
Goa Nightclub Fire Update : गोवा नाइट क्लबप्रकरणी ED कडून तपासाला वेग; गोवा, नवी दिल्ली, गुरुग्राममधील ९ ठिकाणी छापे
Goa Nightclub Fire Update : गोवा नाइट क्लबप्रकरणी ED कडून तपासाला वेग; गोवा, नवी दिल्ली, गुरुग्राममधील ९ ठिकाणी छापे
Published on

सोमेंद्र शर्मा / मुंबई

गोव्यातील नाइट क्लब प्रकरणाशी संबंधित सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गोवा, नवी दिल्ली आणि गुरुग्राम येथील नऊ ठिकाणी छापे टाकून तपास करण्यात आला. या कारवाईत अर्पोरा-नागोआ पंचायतचे सरपंच व सचिव यांच्या कार्यालय/निवासस्थानांचाही समावेश असल्याची माहिती एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत सौरभ लुथरा व अन्य व्यक्तीविरोधात सुरू असलेल्या तपासाचा भाग आहे.

अर्पोरा, गोवा येथील 'बिर्च बाय रोमियो लेन' या नाइट क्लबमध्ये घडलेल्या भीषण आगीच्या घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता.

ईडीने हा तपास गोवा पोलिसांनी नोंदवलेल्या दोन एफआयआरच्या आधारे सुरू केला असून, त्यामध्ये पीएमएलए अंतर्गत येणारे काही अनुसूचित गुन्हे नमूद आहेत. झडतीदरम्यान कायदेशीर परवानग्यांच्या पालनात गंभीर अनियमितता आढळून आल्या. बनावट कागदपत्रांच्या आधारे परवाने मिळवणे तसेच सक्षम प्राधिकरणांची आवश्यक मंजुरी नसतानाही व्यावसायिक उपक्रम सुरू ठेवणे अशा बाबी उघड झाल्या आहेत.

२२ कोटींचा महसूल

झडती कारवाईदरम्यान असे निष्पन्न झाले की 'बिर्च बाय रोमियो लेन' चालवणाऱ्या संस्थेने २०२३-२४ आणि २०२४-२५ या कालावधीत सुमारे २२ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. आवश्यक वैधानिक परवाने नसताना आणि विविध विभागांकडील बनावट ना-हरकत प्रमाणपत्रे/परवाने यांच्या आधारे हा क्लब सुरू असल्याने हा महसूल प्राथमिकदृष्ट्या मिळालेला पैसा असल्याचा संशय आहे तसेच समूहातील संस्थांमार्फत करण्यात आलेल्या परदेशी रेमिटन्स संदर्भातील पुरावेही आढळून आले असून कायद्यांचे उल्लंघन झाले आहे का, याची तपासणी सुरू आहे, असे ईडीने म्हटले आहे. गुन्ह्यातून पीएमएलए, भ्रष्टाचार प्रकरणात खाती गोठवली

बेकायदेशीररित्या चालवण्यात आलेल्या आस्थापनातून मिळालेला कोट्यवधी रुपयांचा निधी काही व्यक्तींच्या वैयक्तिक बँक खात्यांमध्ये तसेच समूहातील इतर संस्थांच्या खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. तपासाशी संबंधित महत्त्वाची दोषारोपणीय कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे झडतीदरम्यान जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय, गुन्ह्यातून मिळालेल्या पैशाचा साठा असल्याचा संशय असलेल्या व्यक्ती व संस्थांची बँक खाती पीएमएलएअंतर्गत गोठवण्यात आली आहेत. या प्रकरणात भ्रष्टाचार तसेच इतर संबंधित व्यक्तींमार्फत करण्यात आलेल्या मनी लॉन्डरिंगचा तपासही सुरू असून अशा दोन व्यक्तींना अलीकडेच गोवा पोलिसांनी अटक केली आहे.

पीएमएलए, भ्रष्टाचार प्रकरणात खाती गोठवली

logo
marathi.freepressjournal.in