गोध्रा हत्याकांडप्रकरणी ६ व ७ मे रोजी सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी

२००२ मध्ये गोध्रा हत्याकांडप्रकरणी गुजरात सरकार व गुन्हेगारांच्या अपिलावर सुप्रीम कोर्ट ६ व ७ मे रोजी अंतिम सुनावणी करणार आहे.
गोध्रा हत्याकांडप्रकरणी ६ व ७ मे रोजी सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : २००२ मध्ये गोध्रा हत्याकांडप्रकरणी गुजरात सरकार व गुन्हेगारांच्या अपिलावर सुप्रीम कोर्ट ६ व ७ मे रोजी अंतिम सुनावणी करणार आहे.

न्या. जे. के. माहेश्वरी व न्या. राजेश बिंदल यांच्या खंडपीठाकडे ही सुनावणी होणार आहे. गुन्हेगारांचे वकील संजय हेगडे यांना गुन्हेगारांविरोधातील आरोपांचा तपशील, कनिष्ठ न्यायालयांचे निष्कर्ष, कागदपत्रांसह आपले युक्तिवाद ३ मेपर्यंत दाखल करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाने अन्य गुन्हेगार व गुजरात सरकारला आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

गेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वकिलाने सांगितले की, २२ वर्षे झाली. माझ्या अशिलाला फाशीची शिक्षा दिलेली नाही. याबाबत कोर्टाला शिक्कामोर्तब करावे लागेल. त्यावर कोर्टाने सांगितले की, गेल्या वर्षभरापासून याप्रकरणी सुनावणी झालेली नाही.

न्या. माहेश्वरी म्हणाले की, आम्हाला सरन्यायाधीशांच्या कार्यालयातून आदेश मिळाले की, फौजदारी अपील व माफीच्या प्रकरणांची एकाचवेळी सुनावणी गरजेची नाही.

२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसच्या ‘एस-६’ डब्याला आग लावण्यात आली. यात ५९ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती.

हायकोर्टाच्या निकालाविरोधात अपील

ऑक्टोबर २०१७ मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात अपील दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाने अनेक गुन्हेगारांची शिक्षा कायम ठेवली, तर ११ जणांची मृत्यूदंडाची शिक्षा आजीवन जन्मठेपेत बदलली आहे.

logo
marathi.freepressjournal.in