कर्नाटकात गोध्राची पुनरावृत्ती; काँग्रेस नेत्याचे भाकीत

या सोहळ्याकडे धार्मिक दृष्टिकोनातून न पाहाता राजकीय दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे असेही हरिप्रसाद यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकात गोध्राची पुनरावृत्ती; काँग्रेस नेत्याचे भाकीत

बंगळुरू : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यासाठी लक्षावधी भाविक अयोध्येत जमा होणार आहेत. त्यानंतर परतताना गुजरातमधील गोध्रासारखी घटना घडण्याची शक्यता आहे, असे भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी के हरिप्रसाद यांनी बुधवारी केले.

कर्नाटक सरकारने सावध झाले पाहिजे. २००२ साली गुजरातमधील गोध्रा रेल्वेस्थानकावर कारसेवकांनी भरलेला डबा पेटवून देण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण गुजरात राज्यात दंगली उसळल्या होत्या. अशाच प्रकारची घटना पुन्हा होऊ शकते, असे हरिप्रसाद यांनी म्हटले आहे. अशी घटना घडू नये, यासाठी सरकारने सर्व उपायोजना कराव्यात. अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी कराव्यात. काही संघटनांचे प्रमुख भाजप नेत्यांना भेटले आहेत. एखादा कट शिजला जात असल्याची शक्यता आहे, असे हरिप्रसाद यांनी खात्रीने सांगितले.

या सोहळ्याकडे धार्मिक दृष्टिकोनातून न पाहाता राजकीय दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे असेही हरिप्रसाद यांनी स्पष्ट केले. चार शंकराचार्य हे हिंदू धर्माचे प्रमुख आहेत. ते या सोहळ्याचे अनावरण करत असतील तर आपण देखील सोहळ्या उपस्थित राहिलो असतो असेही हरिप्रसाद यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in