दिल्लीच्या सराफा बाजारातील सोन्या-चांदीच्या दरात घसरण

चांदीचा भाव १२७६ रुपयांनी घसरून ५८,२०६ रुपये प्रति किलोवरून ५६,९३० रुपयांवर आला
 दिल्लीच्या सराफा बाजारातील सोन्या-चांदीच्या दरात घसरण

राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. बुधवारी दिल्लीत प्रति दहा ग्रॅम सोन्याचा भाव ७६०रुपयांनी घसरून ५१,३०४ रुपयांवर आला. मंगळवारी प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,०६४ रुपये होता. दिल्ली सराफा बाजारातही चांदीच्या दरात घसरण झाली. चांदीचा भाव १२७६ रुपयांनी घसरून ५८,२०६ रुपये प्रति किलोवरून ५६,९३० रुपयांवर आला. दरम्यान, मुंबई सराफा बाजारातही सोने-चांदीत घसरगुंडी झाली. शुद्ध सोने १००६ रुपयांनी स्वस्त होऊन प्रति दहा गॅम ५१,२९८ रु. भाव झाला. तर चांदीत १७०६ रुपयांनी स्वस्त होऊन ५६,४४९ रुपये प्रति किलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १७७० डॉलर प्रति औंस तर चांदी १९.९४ डॉलर प्रति औंस झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, कॉमेक्स ट्रेडिंगमध्ये सोन्याच्या किमतीत०.३५ टक्क्यानी वाढ झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in