रुपयाच्या घसरणीमुळे सोन्या-चांदीच्या दरात झाली वाढ

मागील व्यवहारात सोन्याचा भाव ४९,९५७ रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला होता.
रुपयाच्या घसरणीमुळे सोन्या-चांदीच्या दरात झाली वाढ
Published on

देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गुरुवारी सोने ४४२ रुपयांनी मजबूत झाले आणि ५०,३९९ रुपये प्रति दहा ग्रॅम झाले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती मजबूत झाल्यामुळे आणि रुपयाची तीव्र घसरण यामुळे देशात धातूच्या किमतीत वाढ झाली आहे. मागील व्यवहारात सोन्याचा भाव ४९,९५७ रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

दुसरीकडे चांदीही मजबूत झाली आहे. देशातील सराफा बाजारात चांदी ५५८ रुपयांच्या मजबूतीसह ५८,५८० रुपये प्रति किलो झाले आहे. मागील सत्रात चांदीचा भाव ५८,०२२ रुपये प्रति किलोवर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १६७७ डॉलर प्रति औंस आहे. त्याचवेळी, चांदी १९.६९ डॉलर प्रति औंसच्या किमतीवर व्यवहार करत आहे. एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांचे मत आहे की डॉलर निर्देशांक २० वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्यामुळे सोन्याच्या किमती मजबूत झाल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in