सोने हॉलमार्किंग शुल्कात वाढ; सणासुदीच्या हंगामापूर्वी ₹४५ वरून २७५ पर्यंत भार

भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ने सणासुदीच्या हंगामापूर्वी सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तूंच्या हॉलमार्किंग शुल्कात सुधारणा केली आहे. यानुसार सोन्याच्या हॉलमार्किंगचा दर प्रति वस्तू ₹४५ वरून वाढवून ₹७५ करण्यात आला आहे, तर चांदीसाठीचा ₹३५ चा दर तात्काळ प्रभावाने कायम ठेवण्यात आला आहे.
सोने हॉलमार्किंग शुल्कात वाढ; सणासुदीच्या हंगामापूर्वी ₹४५ वरून २७५ पर्यंत भार
सोने हॉलमार्किंग शुल्कात वाढ; सणासुदीच्या हंगामापूर्वी ₹४५ वरून २७५ पर्यंत भारप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ने सणासुदीच्या हंगामापूर्वी सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तूंच्या हॉलमार्किंग शुल्कात सुधारणा केली आहे. यानुसार सोन्याच्या हॉलमार्किंगचा दर प्रति वस्तू ₹४५ वरून वाढवून ₹७५ करण्यात आला आहे, तर चांदीसाठीचा ₹३५ चा दर तात्काळ प्रभावाने कायम ठेवण्यात आला आहे.

ही शुल्कवाढ १४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या 'बीआयएस (हॉलमार्किंग) दुरुस्ती नियमावली, २०२६' द्वारे अधिसूचित करण्यात आली आहे.

दुरुस्त केलेल्या अनुसूची ४ नुसार, सराफांना आता प्रति जिन्नस ₹७५ हॉलमार्किंग शुल्क द्यावे लागेल, तर एका कन्साइन्मेंटसाठी (प्रषेण) किमान शुल्क ₹२०० निश्चित केले आहे. चांदीच्या वस्तूंच्या बाबतीत, मान्यताप्राप्त अॅसेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर्सना सराफांकडून प्रति वस्तू ₹३५ शुल्क दिले जाईल, ज्यासाठी प्रति कन्साइन्मेंट किमान ₹१५० चे शुल्क असेल. बीआयएस हॉलमार्किंग हे दागिन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मौल्यवान धातूच्या शुद्धतेची पडताळणी करते आणि 'भारतीय मानक ब्युरो' अंतर्गत त्या वस्तूचे प्रमाणन करते.

यामध्ये तीन प्रमुख चिन्हांचा समावेश असतोः बीआयएसचा लोगो, कॅरेट किंवा मिलेसिमल फायटनेस (शुद्धता प्रणांक), आणि सहा अंकी अल्फान्युमेरिक कोड ज्याला 'हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन' नंबर म्हटले जाते.

या निर्णयावर चिंता व्यक्त करत, 'ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल'ने सरकार आणि बीआयएसला या निर्णयाचा तातडीने पुनर्विकार करण्याचे व भागधारकांशी चर्चा होईपर्यंत जुनेच दर कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.

जीजेसी आणि सुवर्ण उद्योगाने नेहमीच हॉलमार्किंगला पाठिंबा दिला आहे. कारण शुद्धतेची खात्री आणि ग्राहकांचा विश्वास हा आमच्या व्यवसायाचा मुख्य पाया आहे. परंतु हॉलमार्किंगला पाठिंबा देणे म्हणजे खर्चात झालेली ६७ टक्क्यांची ही वाढ न तपासता स्वीकारणे असा होत नाही, असेही नमूद करण्यात आले.

प्रामाणिक सराफांवर आर्थिक भार वाढवण्यापूर्वी बनावट हॉलमार्किंग, अनधिकृत कामकाज आणि नियमांचे उल्लंघन यांसारख्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे - राजेश रोकडे, अध्यक्ष, ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल यांनी सांगितले.

नियमांचे पालन करणे हे व्यावसायिकदृष्ट्या परवडणारे राहिले पाहिजे. प्रामाणिक मार्ग अधिक महाग होत गेला आणि अनधिकृत किंवा अनौपचारिक मार्ग चालूच राहिले, तर या दोघांमधील फरक अधिक वाढेल. हे सरकार, उद्योग किंवा ग्राहक कोणासाठीही योग्य नाही, असे जीजेसी उपाध्यक्ष अविनाश गुप्ता म्हणाले.

हॉलमार्किंगचे प्रमाण आता खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे प्रति-वस्तू शुल्क ₹४५ वरून ₹७५ पर्यंत वाढवण्याची या टप्प्यावर का गरज भासली, हे जाणून घेण्याचा अधिकार उद्योगाला आहे.

राजेश रोकडे, अध्यक्ष, ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल

logo
marathi.freepressjournal.in