Gold Rate Hike : दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत वाढ; चांदी स्थिर

ऑक्टोबरमधील घसरणीनंतर सोमवारी सोन्याच्या किमतीत ५०० रुपयांची किंचित वाढ होऊन भाव प्रति १० ग्रॅम १,४२,५०० रुपयांवर पोहोचले. दिवाळीपूर्वी सुवर्णकार आणि किरकोळ विक्रेत्यांनी केलेल्या सणासुदीच्या खरेदीमुळे सोन्याला पुन्हा काहीसा आधार मिळाला.
Gold Rate Hike : दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत वाढ; चांदी स्थिर
Gold Rate Hike : दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत वाढ; चांदी स्थिर'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

नवी दिल्ली : ऑक्टोबरमधील घसरणीनंतर सोमवारी सोन्याच्या किमतीत ५०० रुपयांची किंचित वाढ होऊन भाव प्रति १० ग्रॅम १,४२,५०० रुपयांवर पोहोचले. दिवाळीपूर्वी सुवर्णकार आणि किरकोळ विक्रेत्यांनी केलेल्या सणासुदीच्या खरेदीमुळे सोन्याला पुन्हा काहीसा आधार मिळाला.

९९.९ टक्के शुद्धतेचे सोने शनिवारी प्रति १० ग्रॅम १.४२ लाख रुपयांवर बंद झाले होते. मात्र, चांदीचे भाव प्रति किलो १.८६ लाख रुपयांवर स्थिर राहिले.

व्यापाऱ्यांनी सांगितले की, सणाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णकार आणि किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी वाढवली. यामुळे धातूच्या किमतींना आधार मिळाला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्यामुळे डॉलरमध्ये मूल्य मोजल्या जाणाऱ्या बुलियन (चांदी-सोने) आयात करण्याचा खर्चही वाढला. ऑक्टोबर महिन्यात सोन्यात मोठी घसरण झाली होती; ३० सप्टेंबर रोजी नोंदवलेल्या प्रति १० ग्रॅम १,४९,३०० रुपयांवरून सोन्याचे भाव ७,३०० रुपयांनी घसरले होते. या कालावधीत चांदीमध्ये आणखी तीव्र पडझड पाहायला मिळाली आणि प्रति किलो २.३२ लाख रुपयांवरून चांदी ४६,००० रुपयांनी घसरली.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)