सोन्याचे भाव प्रति तोळ्यामागे वाढणार,आयात करात झाली वाढ

सोन्याची आयात करण्यासाठी सरकारी तिजोरीतील परकीय चलनाचा वापर करावा लागतो.
 सोन्याचे भाव प्रति तोळ्यामागे वाढणार,आयात करात झाली वाढ

भारतीय रुपयाची किंमत ही डॉलरच्या तुलनेत घसरत चालली आहे. ती सावरण्यासाठी सरकारने सोन्यावरील आयात कर १०.७५ टक्क्यांवरून १५ टक्के केला आहे. १८ जुलै रोजी हा कर लागू होणार असल्याने सोन्याचे भाव प्रति तोळ्यामागे अंदाजे १ हजारांनी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोने आयात करणारा देश आहे. सोन्याची आयात करण्यासाठी सरकारी तिजोरीतील परकीय चलनाचा वापर करावा लागतो. आयात वाढल्यामुळे वित्तीय तूट वाढते. हाच ताण कमी करण्यासाठी सरकारने आयात कर वाढवला आहे. ज्यामुळे आयात कमी होईल, आणि पर्यायाने परकीय चलनाचा वापर कमी होईल. मात्र, याचा फटका सामान्य नागरिकांना होणार आहे. भारतात आयात केलेल्या सोन्याचा मोठा भाग हा दागिने बनवण्यासाठी वापरला जातो. आयात कर वाढल्यामुळे आता सोन्याच्या दागिन्यांच्या किंमतीही वाढणार आहेत.

सोन्याचा एकूण आयात कर हा १५.७५ टक्के झाला आहे. त्यात १२.५० टक्के बेसिक इम्पोर्ट ड्युटी, २.५ टक्के कृषी कर आणि०.७५ टक्का सामाजिक कल्याण कर याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त सोन्यावर तीन टक्के जीएसटीही लागू होतो.

सोन्याच्या दागिन्यांचा हिशेब

सोन्याच्या दागिन्यांचा भाव ठरवण्यासाठी ज्वेलर्स एक फिक्स फॉर्म्युला वापरतात. यामध्ये शुद्धता आणि निर्धारित वजन यानुसार हिशेब केला जातो. सोबतच जीएसटी आणि मेकिंग चार्जेसही जोडली जातात. भाव ठरवण्यासाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत घेतली जाते. यात २२ कॅरेट किंवा १८ कॅरेट सोन्याचा दर घेतला जातो. या दराला सोन्याच्या ग्रॅममधील वजनाशी गुणले जाते. त्यानंतर यात मेकिंग चार्जेस आणि ३ टक्के जीएसटीचा समावेश केला जातो. तसेच ३५ रुपये हॉलमार्किंग चार्ज लावला जातो. अशाप्रकारे एका दागिन्याची अंतिम किंमत ठरते. आयात कर वाढल्यामुळे २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम एक हजार रुपयांपर्यंत वाढला आहे. सोन्याचा दर सुमारे ५३ हजार रुपये प्रतितोळा गृहित धरले तर वाढलेला आयात कर लागू झाल्यानंतर या किंमतीत वाढणार आहेत.

हिऱ्यांच्याही वाढल्या किमती

सरकारने सोन्यासोबतच हिऱ्यांवरील कस्टम ड्युटीदेखील वाढवली आहे. सोबतच कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील जीएसटी०.२५ टक्क्यावरून १.५ टक्के करण्यात आला आहे. १८ जुलैपासून हा नियम लागू होईल. त्यामुळे हिऱ्यांच्या किंमती वाढतील.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in