दिल्लीत सलग तिसऱ्या सत्रात सोन्याचा विक्रम

दिल्लीत सलग तिसऱ्या सत्रात सोन्याचा विक्रम

राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव १६० रुपयांनी वधारून ७२ हजार रुपये प्रति १० ग्रॅम या आजीवन उच्चांकावर पोहोचला. मंगळवारी तो विक्रमी ७१,८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. त्याचप्रमाणे चांदीचा भाव २०० रुपयांनी वाढून ८४,७०० रुपये प्रति किलोवर पोहोचला.

नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या किमतींनी बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात नवी उच्चांकी पातळी गाठली. जागतिक बाजारातील मजबूत संकेतांमुळे राष्ट्रीय राजधानीत सोने ७२ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर गेले, असे एचडीएफसी सिक्युरिटीजने सांगितले.

राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव १६० रुपयांनी वधारून ७२ हजार रुपये प्रति १० ग्रॅम या आजीवन उच्चांकावर पोहोचला. मंगळवारी तो विक्रमी ७१,८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. त्याचप्रमाणे चांदीचा भाव २०० रुपयांनी वाढून ८४,७०० रुपये प्रति किलोवर पोहोचला. एचडीएफसी सिक्युरिटीजमधील कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, देशातील बाजारातील तेजीमुळे दिल्लीतील सोन्याच्या किमती (२४कॅरेट) १६० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ७२ हजार रुपये झाल्या.

आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट गोल्ड मागील बंदच्या तुलनेत ६ डॉलरने वाढून २,३५६ डॉलर प्रति औंसवर होते. बुधवारी युरोपियन व्यवहारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली, असे गांधी म्हणाले.

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे कमोडिटी रिसर्चचे वरिष्ठ व्हीपी नवनीत दमानी म्हणाले, सोने आणि चांदी आजही सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. कारण भू-राजकीय तणाव आणि सुरक्षित गुंतवणुकीमुळे सोन्याची मागणी वाढली आहे.

याशिवाय, चांदीचा भावही किरकोळ वाढून २८.१० डॉलर प्रति औंस झाला. मागील सत्रात तो २८.०४ डॉलर प्रति औंसवर बंद झाला होते. एमसीएक्सवरील फ्युचर्स ट्रेडमध्ये, दिवसभरामध्ये सोन्याने ७१,७०९ रुपये प्रति १० ग्रॅम या सार्वकालिक उच्चांकावर उसळी घेतली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in