राजधानीत सोने-चांदीमध्ये घसरण कायम

शुक्रवारच्या सत्रात प्रती तोळ्यामागे सोन्याचा दर ५०,६७५ रुपये होता.
राजधानीत सोने-चांदीमध्ये घसरण कायम

गेल्या काही दिवसातील सोने-चांदीमध्ये सुरु असलेली घसरण सोमवारीही कायम राहिली. राष्ट्रीय राजधानीत सोने ११४ रुपयांनी घसरुन प्रति दहा ग्रॅमचा भाव ५०,५६१ रुपये झाला, असे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. शुक्रवारच्या सत्रात प्रती तोळ्यामागे सोन्याचा दर ५०,६७५ रुपये होता.

चांदीतही सोमवारी १३६ रुपये प्रति किलोने घट झाली. शुक्रवारच्या सत्रात हा दर किलोमागे ५६,८९६ रुपये होता. तसेच स्पॉट गोल्ड किंमतीत दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ११४ रुपयांनी घसरला, असे तपन पटेल, सिनिअर ॲनालिस्ट (कमोडिटीज), एचडीएफसी सिक्युरिटीज यांनी सांगितले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने घसरुन प्रति औंस १७३७ अमेरिकन डॉलर्स झाले तर चांदीत फारसा बदल न होता प्रति औंस १९.१७ अमेरिकन डॉलर्स झाला. दरम्यान, मुंबई सराफा बाजारात सोने-चांदीमध्ये वाढ झाली. सोमवारी शुद्ध सोने प्रति दहा ग्रॅमचा दर ५०,८७७ रुपये झाला असून शुक्रवारी हा दर ५०,८५३ रुपये होता. तसेच चांदीचा भाव प्रति किलो ५६,७४५ रुपये झाला असून शुक्रवारी हा भाव ५६,४२७ रुपये होता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in