सोने-चांदीच्या तेजीचा फुगा फुटला; चांदीच्या भावात ७२,५०० रुपयांनी घट; सोने ३,५०० रुपयांनी घसरले

मजबूत अमेरिकन डॉलरमुळे जागतिक बाजारात विक्रीचा दबाव वाढल्याने आणि गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात १९ टक्क्यांची घसरण होऊन चांदी प्रति किलो ३.१२ लाख रुपयांपर्यंत खाली आली, तर सोन्याचा दर २ टक्क्यांनी घसरून प्रति १० ग्रॅम १.६५ लाख रुपये झाला.
सोने-चांदीच्या तेजीचा फुगा फुटला
सोने-चांदीच्या तेजीचा फुगा फुटला
Published on

नवी दिल्ली : मजबूत अमेरिकन डॉलरमुळे जागतिक बाजारात विक्रीचा दबाव वाढल्याने आणि गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात १९ टक्क्यांची घसरण होऊन चांदी प्रति किलो ३.१२ लाख रुपयांपर्यंत खाली आली, तर सोन्याचा दर २ टक्क्यांनी घसरून प्रति १० ग्रॅम १.६५ लाख रुपये झाला.

अखिल भारतीय सराफा असोसिएशननुसार, चांदीच्या किमतींमध्ये ७२,५०० रुपयांनी मोठी घसरण झाली. चांदीचा प्रति किलो दर शनिवारी ३,१२,००० रुपये राहिला.

सोन्याच्या दरालाही उतरती कळा लागली असून सोने ३,५०० रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम १,६५,५०० रुपये झाले. ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर गुरुवारी प्रति १० ग्रॅम १,८३,००० रुपयांचा विक्रम गाठल्यानंतर मागील व्यवहारात ७.६ टक्क्यांनी घसरून १,६९,००० रुपये झाला होता.

जानेवारीत सोन्याच्या किमतींमध्येही मोठी वाढ नोंदवली गेली असून, गेल्या वर्षाअखेरीस नोंदवलेल्या प्रति १० ग्रॅम १,३७,७०० रुपये दरावरून सोने २७,८०० रुपये किंवा २०.२ टक्क्यांनी वाढले. विश्लेषकांच्या मते, डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे ही विक्री झाली असून त्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in