सोने-चांदीची घसरण सुरूच; सोन्याचे दर दोन हजारांनी, तर चांदी ५ हजार रुपयांनी घसरली

सोने-चांदीच्या दरात गुरुवारी पुन्हा मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर बुधवारी १,३२,००० होते ते गुरुवारी दोन हजार रुपयांनी घसरून १,३०,००० वर खाली आले आहेत, तर चांदीच्या बुधवारच्या दरात पाच हजार रुपयांची घसरण होऊन ती १,६९,००० वरून १,६४,००० वर खाली आली आहे.
सोने-चांदीची घसरण सुरूच; सोन्याचे दर दोन हजारांनी, तर चांदी ५ हजार रुपयांनी घसरली
सोने-चांदीची घसरण सुरूच; सोन्याचे दर दोन हजारांनी, तर चांदी ५ हजार रुपयांनी घसरली'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : सोने-चांदीच्या दरात गुरुवारी पुन्हा मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर बुधवारी १,३२,००० होते ते गुरुवारी दोन हजार रुपयांनी घसरून १,३०,००० वर खाली आले आहेत, तर चांदीच्या बुधवारच्या दरात पाच हजार रुपयांची घसरण होऊन ती १,६९,००० वरून १,६४,००० वर खाली आली आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यांसाठी सोने आणि चांदीची खरेदी करण्याची तयारी करत असलेल्या लोकांना नोव्हेंबर महिना हा दिलासादायक ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे.

चांदी तर जवळपास १३ दिवसांत २५,००० रुपयांपर्यंत स्वस्त झाली आहे, तर सोन्याच्या भावातही सुमारे ६ टक्क्यांची घसरण झाली आहे. बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने सलग सहाव्या कारोबारी सत्रात स्वस्त झाले आहे. दुसरीकडे, चांदीची किंमत एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे.

चांदीचे दर खूपच घसरले

चांदीच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांत मोठी घसरण झाली आहे. अखिल भारतीय सराफा संघाच्या मते, बुधवारी दिल्लीत चांदी ९,५०० रुपये म्हणजेच ५.३ टक्के कोसळून १,६९,५०० रुपये प्रति किलोवर आली. याआधीच्या कारोबारी सत्रात तिचा भाव १,७९,००० रुपये प्रति किलो होता. ५ नोव्हेंबरपासून आतापर्यंत आठ सत्रांमध्ये चांदी सुमारे २५,००० रुपये म्हणजेच १३ टक्के स्वस्त झाली आहे. गेल्या वर्षी १३ नोव्हेंबर रोजीही चांदी याच्या आसपासच म्हणजे १,६९,००० रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती.

सोन्याची तेजस्विताझाली कमी

चांदीसोबतच सोन्याची चमकही कमी होत आहे. बुधवारी ९९.९ टक्के शुद्धतेचे सोने १,४०० रुपये घसरून १,३८,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आले. मंगळवारी याचा भाव १,४०,००० रुपये प्रति १० ग्रॅम होता. ९ नोव्हेंबरपासून आतापर्यंत सोन्याची किंमत ८,३०० रुपये म्हणजेच सुमारे ६ टक्क्यांनी घसरली आहे.

डिसेंबरमध्ये दर होणार आणखी स्वस्त?

डिसेंबरमध्येही सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतार कायम राहू शकतो. जर अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले आणि डॉलर मजबूत राहिला, तर मौल्यवान धातूंवरील दबाव आणखी वाढू शकतो, असे मत मिराए ॲसेट शेअरखानचे कमोडिटी प्रमुख प्रवीण सिंह यांनी व्यक्त केले. मात्र, डिसेंबरमध्ये सोने-चांदी सातत्याने स्वस्तच राहील, असे नाही. जर आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली, डॉलर कमकुवत झाला किंवा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे वळले, तर पुन्हा तेजीही येऊ शकते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)