गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित; मुसेवाला हत्येप्रकरणी केंद्र सरकारचा निर्णय

गोल्डी ब्रार पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.
गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित; मुसेवाला हत्येप्रकरणी केंद्र सरकारचा निर्णय
Published on

नवी दिल्ली : कॅनडात राहून भारतात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या गँगस्टर गोल्डी ब्रारवर केंद्र सरकारने बेकायदा कृत्यविरोधी प्रतिबंध कायद्यांतर्गत (यूएपीए) गोल्डी ब्रारला दहशतवादी घोषित केले आहे. गोल्डी ब्रार पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने गोल्डी ब्रारबाबत एक पत्रक जाहीर केले. त्यात म्हटले की, “गोल्डी ब्रारचे प्रतिबंधित खलिस्तानी संघटना बब्बर खालसाशी संबंध आहेत. तसेच, सीमेपलीकडे दहशतवादी संघटनांचा गोल्डीला पाठिंबा असून अनेक खून प्रकरणांशी त्याचा संबंध आहे. नेत्यांना धमकी देणं, खंडणी मागणं आणि एखाद्या खुनानंतर गोल्डी ब्रारकडून सोशल मीडियावर दावा सांगण्यात येत होता.”

“पंजाबमधील शांतता, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट गोल्डी ब्रार आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून रचण्यात येत आहे. त्यात दहशतवादी कारवाया करणे, खून करणे आणि अन्य कृत्यांचा सहभाग आहे. तसेच, गोल्डी ब्रार सीमेपलीकडून ड्रोनमार्फत शस्त्रे, दारुगोळा, स्फोटकांसाठी साधने पुरवत होता,” असेही गृहमंत्रालयाने पत्रकात सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in