अयोध्येतील हॉटेल व्यवसायाला अच्छे दिन

व्हिआयपी ग्रहकांना या ठिकाणी राहता यावे यासाठी सिग्नेट कलेक्शन केकेने अयोध्येतील सर्व हॉटेल्सच्या ४५ टक्के रुम्स मंदिर ट्रस्टसाठी बुक केल्या आहेत.
अयोध्येतील हॉटेल व्यवसायाला अच्छे दिन

अयोध्या : येथील सर्व हॉटेल्स केवळ २२ जानेवारीसाठीच नव्हे तर संपूर्ण महिन्यासाठी १०० टक्के बुक झाली आहेत. काही विशेष हॉटेल्सनी आधीच १०० टक्के बुकिंग झाल्याचे जाहीर केले आहे. तसेच लखनौ, प्रयागराज आणि गोरखपूरमध्ये अयोध्याराम मंदिराच्या १७० किमी परिघात असलेल्या हॉटेल्सच्या मागणीतही झपाट्याने वाढ होत आहे. सिग्नेट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक म्हणाले की त्यांच्या सर्व रुम्स या महिन्यासाठी बुक केल्या गेल्या आहेत. हॉटेलमधील खोलीचे सरासरी दर ८५,००० रुपयांच्या पुढे गेले आहेत.

व्हिआयपी ग्रहकांना या ठिकाणी राहता यावे यासाठी सिग्नेट कलेक्शन केकेने अयोध्येतील सर्व हॉटेल्सच्या ४५ टक्के रुम्स मंदिर ट्रस्टसाठी बुक केल्या आहेत. रॅडिसनने गेल्या बुधवारी अयोध्येत पार्क इन सुरू करण्यात आले आणि ते २१ जानेवारीपर्यंत पूर्णपणे बुकही झाले आहे. हा खूप व्यस्त काळ आहे. केवळ अयोध्येतीलच नाही तर लखनऊमधील सर्व हॉटेल्स पूर्णपणे बुक केली जातील अशी त्यांची अपेक्षा आहे, असे मत सरोवर हॉटेल आणि रिसॉर्टच्या व्यवस्थापकीय संचालकांनी व्यक्त केले आहे. सिग्नेट कलेक्शन केके हॉटेलमधील सर्व रुम्स या महिन्यासाठी आगाऊ बुक करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रत्येक रुम सुमारे ८५,००० रुपये आणि त्याहूनही महागड्या किमतीत बुक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in