सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांसाठी खुशखबर, तेलाचे दर होणार एवढे कमी

सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांसाठी खुशखबर, तेलाचे दर होणार एवढे कमी

खाद्यतेलाचे दर कमी करण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्याचबरोबर खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याच्या सूचना तेल कंपन्यांना दिल्या होत्या
Published on

सणासुदीच्या सुरुवातीला तेलाच्या किमती 10 रुपयांनी कमी करण्याच्या सूचना तेल कंपन्यांना सरकारकडून मिळण्याची शक्यता आहे. हा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यास त्याचा फायदा सर्वसामान्यांना होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून तेलाच्या किमती कमी होत असल्या तरी त्या आणखी कमी करण्याची गरज आहे. सरकार तेलाच्या किमती कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. खाद्यतेलाची तपासणी करण्यासाठी अन्न विभागाच्या सचिवांनी गुरुवारी तेल कंपन्यांची बैठक बोलावली, त्या बैठकीत सरकार तेल कंपन्यांना 10 रुपयांपर्यंत दर कमी करण्याच्या सूचना देऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे.

खाद्यतेलाचे दर कमी करण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्याचबरोबर खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याच्या सूचना तेल कंपन्यांना दिल्या होत्या. सरकारच्या सूचनेनंतर 200 रुपयांनी विकल्या जाणाऱ्या खाद्यतेलाचा भाव 160-170 रुपयांवर गेला होता.

गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी 20 ते 25 रुपयांची कपात केली होती. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती घसरल्या असून, त्याचा फायदा छोट्या-मोठ्या बाजारपेठांनाही होत असल्याचे सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या किमती 50 टक्क्यांनी कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in