खुशखबर! १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर आता 'नो टॅक्स'...अर्थमंत्र्यांनी नव्या टॅक्स स्लॅब्जची केली घोषणा; बघा डिटेल्स

Union Budget 2025 : नोकरदार लोकांनी नवीन कर व्यवस्था निवडल्यास १२.७५ लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. कारण, सरकार 87A अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्लॅबचे कर माफ करणार आहे. याशिवाय स्टँडर्ड डिडक्शन ७५,००० रुपये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नोकरदारांचे १२.७५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होईल.
खुशखबर! १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर आता 'नो टॅक्स'...अर्थमंत्र्यांनी नव्या टॅक्स स्लॅब्जची केली घोषणा; बघा डिटेल्स
खुशखबर! १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर आता 'नो टॅक्स'...अर्थमंत्र्यांनी नव्या टॅक्स स्लॅब्जची केली घोषणा; बघा डिटेल्सBudget 2025
Published on

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात एक मोठी घोषणा केली आहे. यानुसार, आता नोकरदारांना १२ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरण्याची गरज नाही. नवीन करप्रणाली अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. यानुसार, नोकरदार लोकांनी नवीन कर व्यवस्था निवडल्यास १२.७५ लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. कारण, सरकार 87A अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्लॅबचे कर माफ करणार आहे. याशिवाय स्टँडर्ड डिडक्शन ७५,००० रुपये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नोकरदारांचे १२.७५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होईल.

यापूर्वी ७ लाख रुपयांच्या कमाईवर कोणताही कर भरावा लागत नव्हता. याशिवाय, जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर आता मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आता २४ लाख रुपयांच्या उत्पन्नावर ३० टक्के कर आकारला जाणार आहे. ७५ हजार रुपयांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शनची सूट असेल. तसेच, १५-२० लाख रुपयांच्या उत्पन्नावर २० टक्के कर लागेल. ८ ते १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर १० टक्के आयकर लागेल.

उल्लेखनीय आहे की गेल्या अर्थसंकल्प २०२४ मध्ये, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मानक कपातीची मर्यादा वाढवून नवीन कर प्रणालीमध्ये मोठी भेट दिली होती. ही मर्यादा ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपये करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा नवीन टॅक्स स्लॅबमध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी मोठा बदल करण्यात आला आहे.

बदलानंतर नवीन करप्रणाली -

शून्य ते ४ लाखापर्यंत - ०%

३ ते ८ लाख - ५%

८-१२ लाख -१०%

१२-१६ लाख - १५%

१६-२० लाख - २०%

२०-२४ लाख: २५%

२४ लाखांहून जास्त - ३०%

जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही -

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पूर्वीप्रमाणे जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये ५ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. ५० हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन देखील आहे.

ओल्ड टॅक्स स्‍लॅब -

० ते २.५ लाखापर्यंत - ०%

२.५ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंत - ५%

५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत - २०%

१० लाखाहून जास्त : ३० %

logo
marathi.freepressjournal.in