Google Cloud Layoffs : गुगल क्लाऊडची भारतात नोकरकपात

कामाच्या प्राधान्यक्रमात केलेल्या बदलांचा एक भाग म्हणून गेल्या आठवड्यात भारतात ३० पदे कमी करण्यात आल्याची माहिती ‘गुगल क्लाउड’ने दिली आहे.
Google Cloud Layoffs : गुगल क्लाऊडची भारतात नोकरकपात
Google Cloud Layoffs : गुगल क्लाऊडची भारतात नोकरकपातप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

नवी दिल्ली : कामाच्या प्राधान्यक्रमात केलेल्या बदलांचा एक भाग म्हणून गेल्या आठवड्यात भारतात ३० पदे कमी करण्यात आल्याची माहिती ‘गुगल क्लाउड’ने दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत कंपनीने भारतीय कामकाजात मोठ्या प्रमाणावर नोकरकपात होत असल्याच्या अफवा "पूर्णपणे चुकीच्या" असल्याचे सांगून फेटाळून लावल्या आहेत.

या अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत. गेल्या आठवड्यात गुगल क्लाउडने भारतात एक छोटासा संघटनात्मक बदल केला असून, कामाच्या प्राधान्यक्रमात केलेल्या बदलांचा भाग म्हणून सुमारे ३० पदे कमी करण्यात आली आहेत, असे ‘गुगल क्लाउड इंडिया’ने पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. ‘ब्लाईंड’ व्यासपीठावर नोकरकपात व नोकरीवरून काढून टाकण्याच्या नोटिसा दिल्या जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)