गुगलचा दणका; प्ले-स्टोअरवरून हटवले अनेक भारतीय मॅट्रिमोनी ॲप्स

गुगलने शुक्रवारी प्लेस्टोअरवरून अनेक भारतीय मॅट्रिमोनी ॲप्स काढून टाकण्यास सुरुवात केली आहे
गुगलचा दणका; प्ले-स्टोअरवरून हटवले अनेक भारतीय मॅट्रिमोनी ॲप्स

नवी दिल्ली : गुगलने अनेक भारतीय मॅट्रिमोनी ॲप्लिकेशन्स प्लेस्टोअरवरून हटवली आहेत. शुल्कासंबंधी वादातून शुक्रवारी ही कृती करण्यात आली आहे.

भारतातील काही स्टार्टअप कंपन्यांनी गुगलद्वारे ११ ते २६ टक्के इन-ॲप शुल्क आकारले जाण्याला विरोध केला होता. त्यावरून वाद उत्पन्न झाला होता. मात्र, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालय आणि अन्य न्यायालयाने गुगलच्या बाजूने निकाल देत शुल्क न भरल्यास प्लेस्टोअरवरून ॲप्स काढून टाकण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार गुगलने शुक्रवारी प्लेस्टोअरवरून अनेक ॲप्स काढून टाकण्यास सुरुवात केली. त्यात मॅट्रिमोनी डॉटकॉमच्या भारत मॅट्रिमोनी, ख्रिश्चन मॅट्रिमोनी, मुस्लीम मॅट्रिमोनी यांच्यासह जोडी या ॲप्सचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in