१८ ओटीटी प्लॅटफाॅर्म बंद; अश्लील कंटेटप्रकरणी कारवाई, १९ संकेतस्थळांसह १० ॲपवरही बडगा

अश्लील, असभ्य आणि बीभत्स साहित्य प्रकाशित करणारे १८ ओटीटी मंच आणि त्यांच्याशी संबंधित समाज माध्यम खाती यांच्यावर गुरुवारी केंद्र सरकारने कारवाईचा बडगा उगारला आणि...
१८ ओटीटी प्लॅटफाॅर्म बंद; अश्लील कंटेटप्रकरणी कारवाई, १९ संकेतस्थळांसह १० ॲपवरही बडगा

नवी दिल्ली : अश्लील, असभ्य आणि बीभत्स साहित्य प्रकाशित करणारे १८ ओटीटी मंच आणि त्यांच्याशी संबंधित समाज माध्यम खाती यांच्यावर गुरुवारी केंद्र सरकारने कारवाईचा बडगा उगारला आणि ही खाती व मंच बंद करून टाकले.

याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या एका निवेदनामध्ये म्हटले आहे की, १८ ओटीटी मंच, १९ संकेतस्थळे, १० ॲप (गुगल प्लेवरील सात आणि ॲपल ॲपवरील तीन) आणि त्यांच्याशी संबंधित ५७ समाज माध्यम खाती यांना भारतात शिरकाव करता येणार नाही. सर्जनशील अभिव्यक्तीच्या बुरख्याआडून अश्लील, असभ्य आणि बीभत्स साहित्य प्रकाशित न करणे ही संबंधित मंचांची जबाबदारी आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. ओटीटी मंचांविरुद्धचा निर्णय ‘माहिती तंत्रज्ञान कायदा २०००’मधील तरतुदींनुसार घेण्यात आला आहे.

सदर निर्णय घेण्यापूर्वी अन्य शासकीय विभाग, माध्यम आणि करमणूक क्षेत्रातील तज्ज्ञ, महिला आणि बालहक्क यांच्याशी संबंधित काम करणाऱ्या तज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात आली आहे.

या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी

ड्रिम्स फिल्म्स, वुव्ही, येस्समा, अनकट अड्डा, ट्री फ्लिक्स, एक्स प्राइम, निऑन एक्स, व्हीआयपी, बेशरम्स, हंटर्स, रॅबिट, एक्स्ट्रामुड, न्यूफ्लिक्स, मूडएक्स, मोजफ्लिक्स, हॉट शॉट्स व्हीआयपी, फुगी, चिकुफ्लिक्स, प्राइम प्ले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in