नवी दिल्ली : ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने दिल्लीतील सर्व केंद्र सरकारी कार्यालये ८ ते १० सप्टेंबरदरम्यान बंद राहणार आहेत, असे आदेश कार्मिक खात्याने काढले आहेत. ही जी-२० परिषद दिल्लीत ९ व १० सप्टेंबरला होणार आहे.
या परिषदेसाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या परिषदेला ‘जी-२०’ परिषदेतील सदस्य राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.