नवी संसद भवनाच्या उद्घाटनानंतर भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत सरकारने पोहचावे, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांना दिले. पंतप्रधान मोदी यांनी भाजप मुख्यालयात जाऊन भाजपच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला योगी आदित्यनाथ, हेमंत बिस्व सरमा, शिवराज सिंह चौहान सहित पूर्वात्तोवर राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीपूर्वी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी जनतेच्या सेवेत दाखल होण्याचे आदेश दिले. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
विरोधी पक्षांवर टीका करण्यापेक्षा थेट जनतेच्या संपर्कात राहा. राज्य सरकारनी स्थानिक लोकांच्या भावना लक्षात घेऊन कार्यक्रम आखावेत. तसेच केवळ राजधानीत न राहता दूरपर्यंत थेट पोहोचा, असे आदेश मोदींनी दिल्याचे सांगितले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अजेंडयाबाबत चर्चा केली. कोणते मुद्दे घेऊन स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन निवडणुकीत उतरावे, असे मोदी यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या योजनांमुळे महिला, तरुणांमध्ये विशेष समर्थक वर्ग तयार केला आहे. गरीब, आदिवासी, मागासांना एकत्रित घेऊन पक्षाला हॅट्रिक करायची आहे.
२९ मे रोजी देशातील सर्वच राज्यात पत्रकार परिषद करून लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार आहे. जेथे भाजपचे सरकार आहे. तेथे मुख्यमंत्री पत्रकार परिषद करतील. जिथे भाजपचे सरकार नाही. तिथे केंद्रीय मंत्री प्रदेशाध्यक्षांसोबत पत्रकार परिषद करतील.
दिल्लीत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा सोबत पत्रकार परिषद करतील. केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण मुंबईत, स्मृति ईरानी रोहतकमध्ये और अनुराग ठाकुर गुजरातमध्ये पत्रकारांशी चर्चा करतील.