RBI कडून सरकारला १ लाख कोटींचा लाभांश

अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आगामी आर्थिक वर्षात सरकारला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून १.०२ लाख कोटी रुपये लाभांश मिळणार आहे.
RBI कडून सरकारला १ लाख कोटींचा लाभांश

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आगामी आर्थिक वर्षात सरकारला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून १.०२ लाख कोटी रुपये लाभांश मिळणार आहे. वर्तमान आर्थिक वर्षात मात्र सरकारला १.०४ लाख कोटी लाभांश मिळणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारला ४८ हजार कोटी लाभांश अपेक्षित होता पण प्रत्यक्षात मात्र १.०४ लाख कोटी लाभांश मिळणार आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात आरबीआयने सरकारला ८७४१६ कोटी रुपये लाभांश दिला होता, तर त्याआधीच्या वित्तीय वर्षात सरकारने आरबीआय आणि वित्तीय सेवा संस्थांकडून ३९९६१ कोटी रुपये लाभांश मिळवला आहे. तसेच सरकारने केंद्रीय सार्वजनिक उद्योगांकडून ४३ हजार कोटी रुपये लाभांश मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या अन्य गुंतवणुकीवरील लाभांशापोटी ५० हजार कोटी रुपये लाभांश अपेक्षित आहे. अशा प्रकारे आरबीआय, केंद्र सरकारचे सार्वजनिक उद्योग, सरकारी बँका या सर्वांकडून सरकारला वर्तमान आर्थिक वर्षी एकूण १५४४०७ कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे, तर पुढील वर्षी हे उत्पन्न किंचित घसरून १.५० लाख कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे.

logo
marathi.freepressjournal.in