नवी दिल्ली : देशातील वाढती महागाई लक्षात घेता सरकारने आता पावले उचलायला सुरुवात केली आहे. ‘भारत डाळ’ या ब्रँड अंतर्गत केंद्र सरकारने अनुदानित सरकारी चणाडाळ आणली आहे. ही डाळ ६० रुपये किलोने मिळणार आहे. केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत ही डाळ बाजारात आणण्यात आली.
या चणाडाळीचे ३० किलोचे पोते प्रति ५५ रुपये दराने मिळणार आहे. ही अनुदानित चणाडाळ दिल्ली-एनसीआर भागात नाफेडच्या दुकानातून मिळणार आहे. सरकारकडे चण्याचा मोठा साठा असून त्याचे रुपांतर चणा डाळीत केले जाणार आहे.