केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय  ; एलपीजी गॅस सिलिंडर ६०० रुपयांना मिळणार

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय ; एलपीजी गॅस सिलिंडर ६०० रुपयांना मिळणार

उज्वला योजनेतील लाभार्थींना आता २०० ऐवजी ३०० रुपयांचं अनुदान मिळणार आहे.

महागाई कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलायला सुरुवाती केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राने महागाईपासून दिलासा देण्यासाठी एलपीजीवरील अनुदानात वाढ केली आहे. त्यामुळे उज्वला योजनेतील लाभार्थींना आता २०० ऐवजी ३०० रुपयांचं अनुदान मिळणार आहे. याआधी रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने केंद्र सरकारने २०० रुपयांचं अनुदान जाहीर केल होतं.

मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही एलपीजी सिलिंडर २०० रुपयांनी कमी केले होते. त्यामुळे ११०० वरुन ९०० रुपयांपर्यंत ही किंम्मत कमी झाली होती. उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हा सिलेंडर ७०० रुपयांना मिळू लागला होता. आता उज्वला लाभार्थ्यांच्या भगिनींना ३०० रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ६०० रुपयांना सिलेंडर मिळणार असल्याचं अनुराग ठाकूर म्हणाले.

सध्या दिल्लीतील उज्वला गॅसच्या लाभार्थ्यांना १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरसाठी ७०३ रुपये मोजावेल लागतात. सामान्य नागरिकांना या सिलिंडरसाठी ९०३ रुपये मोजावेल लागतात. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्मयानंतर आता उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एलपीजी गॅस सिलिंडर ६०० रुपयांना मिळणार आहे.

याच बरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तेलंगणामध्ये केंद्रीय आदिवासी विद्यापीठ सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी ८८९ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. तसंच केंद्र सरकारने केंद्रीय हळद महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in