कोलकाता : मुंबई-रांची दरम्यान खासगी वाहक इंडिगोचे विमान खराब हवामानामुळे कोलकाता येथे वळवल्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी आश्वासन देऊनही व्यवस्था करण्यास नकार दिला, असा दावा या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केला आहे. मात्र या संबंधात इंडिगोने सांगितले की, सर्व प्रवाशांना जेवण देण्यात आले आणि त्यांना परतावा किंवा पर्यायी फ्लाइटचा पर्याय देण्यात आला.
१९ जानेवारीला ६ ई-२२१ हे ते इंडिगोचे विमान होते. एक प्रवासी विक्रम श्रीवास्तव यांनी सोशल मीडियावर सांगितले की, त्यांना हॉटेलमध्ये राहण्याचे आणि पर्यायी फ्लाइटचे खोटे आश्वासन देण्यात आले होते आणि नंतर त्यांना उतरवण्यात आले. हे ग्राऊंड स्टाफने सर्वकाही नाकारले.
ते म्हणाले की, विमानात गर्भवती महिला आणि वृद्ध लोक प्रवास करत होते. परंतु असे असूनही इंडिगो टीमने प्रवाशांना मदत करण्यास नकार दिला आणि त्यांना तिसऱ्या स्थानावर स्वतःची व्यवस्था करण्यास सांगितले.