जुलै महिन्यात जीएसटी संकलन;गतवर्षीच्या तुलनेत २८ टक्के वाढ

सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आयात केलेल्या वस्तूंवर कर म्हणून ४१,४२० कोटी रुपये जमा झाले.
जुलै महिन्यात जीएसटी संकलन;गतवर्षीच्या तुलनेत २८  टक्के वाढ

जुलै महिन्यात जीएसटी संकलन १,४८,९९५ कोटी रुपयांचे झाले आहे. ही रक्कम मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी संकलनाच्या रकमेपेक्षा २८ टक्के अधिक आहे. मागील वर्षीच्या याच महिन्यातील १,१६,३९३ कोटी रुपये जमा झाला होता. जीएसटी सप्टेंबर २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर हा दुसरा सर्वात मोठा संग्रह आहे.

जीएसटी संकलनाच्या या रकमेपैकी सीजीएसटी २५,७५१ कोटी रुपये, एसजीएसटी ३२,८०७ कोटी रुपये आणि आयजीएसटी ७९,५१८ कोटी रुपये जमा झाले आहेत. जीएसटी संकलनाबाबत सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आयात केलेल्या वस्तूंवर कर म्हणून ४१,४२० कोटी रुपये जमा झाले. याशिवाय १०,९२० कोटी रुपये उपकर म्हणून वसूल करण्यात आले आहेत. या आकडेवारीनुसार देशात आयात होणाऱ्या मालावर ९९५ कोटी रुपयांचा उपकर लावण्यात आला आहे. जीएसटी वसुलीची ही आकडेवारी अर्थ मंत्रालयाने जाहीर केली आहे. यापूर्वी जून महिन्यात जीएसटी संकलन १.४४ लाख कोटी रुपये झाले होते. सलग पाच महिन्यांत एकूण जीएसटी संकलनाची रक्कम १.४० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. दर महिन्याला जीएसटीच्या आकड्यांमध्ये वाढ होत आहे. जुलै महिन्यात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक जीएसटी संकलन महाराष्ट्रात २२,१२९ कोटी रुपये इतके झाले असून गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत त्यात १७ टक्के वाढ नोंदवण्यात आली. गोवा राज्याच्या जीएसटी संकलनामध्येही गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत ४३ टक्के वाढ झाली असून या जुलै महिन्यात गोव्यात ४३३ कोटी रुपये इतका जीएसटी संकलित करण्यात आला.

गेले सलग पाच महिने, मासिक जीएसटी महसूल संकलन १.४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असून, महसूल संकलन दर महिन्याला भक्कम वाढ दर्शवत आहे. जुलै २०२२पर्यंत जीएसटी महसुलात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३५ टक्के इतकी वाढ झाली असून ही वाढ मोठ्या प्रमाणात उत्साहवर्धक आहे. अधिक चांगल्या प्रकारे अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी जीएसटी परिषदेने मागील काळात केलेल्या विविध उपाययोजनांचा हा स्पष्ट परिणाम आहे. जीएसएसटी संकलनाच्या उत्तम नोंदीसह अर्थव्यवस्था रुळावर येण्याचा सकारात्मक परिणाम जीएसटी महसुलावर सातत्यपूर्ण आधारावर दिसून येत आहे.

जून २०२२ मध्ये ७.४५ कोटी ई-वे देयकांची निर्मिती झाली, जी मे २०२२ मधील ७.३६ कोटी देयकांच्या तुलनेत काहीशी अधिक आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in