गुजरात एटीएसकडून ISIS च्या ३ दहशतवाद्यांना अटक

गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अहमदाबादमधील अडालज येथे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या तीन जणांना अटक केली आहे. एटीएस पथक गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. तपासात हे तिघेही ‘आयसिस’साठी काम करत असल्याचे समोर आले.
गुजरात एटीएसकडून ISIS च्या ३ दहशतवाद्यांना अटक
गुजरात एटीएसकडून ISIS च्या ३ दहशतवाद्यांना अटकPhoto : X (AskAnshul)
Published on

अहमदाबाद : गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अहमदाबादमधील अडालज येथे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या तीन जणांना अटक केली आहे. एटीएस पथक गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. तपासात हे तिघेही ‘आयसिस’साठी काम करत असल्याचे समोर आले.

तीन दहशतवाद्यांना अटक करून गुजरात एटीएसने एक मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. या तिघांमध्ये तेलंगणातील डॉ. अहमद मोहियुद्दीन सय्यद या डॉक्टरचा समावेश असून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि रासायनिक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली.

आझाद सुलेमान शेख आणि मोहम्मद सुहैल मोहम्मद सलीम हे अन्य दोन अटक दहशतवादी उत्तर प्रदेशातील आहेत. हे आरोपी गुजरातमध्ये शस्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी आले होते आणि ‘रायसिन’ नावाच्या विषारी रासायनिक पदार्थाचा वापर करून दहशतवादी कारवायांचा कट त्यांनी रचला होता, अशी माहिती गुजरात एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in