Gujrat Bridge Collapsed: बांधकाम सुरु असलेला पुल कोसळल्याने एकाचा मृत्यू ; गुजरातच्या पालनपूर येथील घटना

या घटनेच्या तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञाची एक टीम गांधीनगरहून रवाना झाली आहे.
Gujrat Bridge Collapsed: बांधकाम सुरु असलेला पुल कोसळल्याने एकाचा मृत्यू ; गुजरातच्या पालनपूर येथील घटना

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील रत्नागिरीत मुंबई-गोवा महामार्गावरील बांधकाम सुरु असलेला ब्रीज कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता गुजरातमध्ये पालनपूरमध्ये एक बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी ब्रीज कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पालनपूरचे जिल्हाधिकारी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

पालनपूरमध्ये एक रेल्वे क्राॉसिंग आहे. त्यावर एक ब्रीज उभारण्याचं काम सुरु आहे. यावेळी दोन खांबांच्या दरम्यान जे गर्डर टाकण्यात आलं होतं. या कामात काहीतरी मेकॅनिकल बिघाड झाल्यानं ते कोसळल्याचा अंदाज प्राथमिकदृष्ट्या वर्तवला जात आहे. अशी माहिती बनासकांठा पालनपूरचे जिल्हाधिकारी वरुण बरनवल यांनी दिली आहे.

या घटनेच्या तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञाची एक टीम गांधीनगरहून रवाना झाली आहे. आज रात्रीत या दुर्घटनेचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची एक टीमन गांधीनगरहुन रवाना झाली आहे. आज रात्रीपर्यंत याचा रिपोर्ट येणं अपेक्षित आहे की, नेमकी दुर्घटना नेमकी कशामुळे घडली. हा रिपोर्ट आल्यानंतर याबाबत स्पष्टपणे सांगता येणार आहे. पण सध्यातरी मेकॅनिकल फेल्युअरमुळं ही दुर्घटना घडल्याचा अनुमान लावला जात असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

अपघातस्थळी ढिगाऱ्यातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून बचावरकार्य सुरु आहे. क्रेन्स आणि इतर उपकरणांच्या सहय्यानं घटनास्थळावर क्लिअरिंगचं काम सुरु आहे. जशी दुर्घटना जागा मोकळी केली जाईल, त्यानंतर इतर माहिती देखील उपलब्ध होईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in