गुजरातमध्ये पूलाचा स्लॅब कोसळून ८ जण पडले

जुनागडच्या मांगरोल तालुक्यात अजाज गावात ही घटना घडली. हा पूल केशोद व माधवपूरला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. या ठिकाणाहून अनेक वाहन जात असतात.
गुजरातमध्ये पूलाचा स्लॅब कोसळून ८ जण पडले
Published on

जुनागढ : दुरुस्ती सुरू असलेल्या पुलाचा स्लॅब कोसळून ८ जण १५ फूट खाली पडले. सुदैवाने सर्व जणांना वाचवण्यात यश आले आहे.

जुनागडच्या मांगरोल तालुक्यात अजाज गावात ही घटना घडली. हा पूल केशोद व माधवपूरला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. या ठिकाणाहून अनेक वाहन जात असतात.

मंगळवारी ( दि. १५) सकाळी या पुलाच्या देखभालीचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक पुलाचा स्लॅब कोसळला. पुलाच्या स्लॅबवर काही लोक उभे होते. ते थेट नदीत पडले. मात्र, कोणीही गंभीर जखमी झाले नाहीत.

गुजरातमध्ये एका आठवड्यात पूल तुटण्याची दुसरी घटना उघड झाली आहे. ९ जुलैला वडोदऱ्यात एक ब्रीज तुटला होता. त्यात २१ जणांचा मृत्यू झाला.

logo
marathi.freepressjournal.in