अहमदाबाद : पक्षनेतृत्वाच्या कार्यशैलीबद्दल निराशा व्यक्त करीत गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील खंभात मतदारसंघात प्रथमच आमदार झालेले काँग्रेसचे आमदार चिराग पटेल यांनी मंगळवारी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
पक्षाच्या राज्य युनिटमध्ये गटबाजी असल्याचे सांगत त्यांनी सांगितले की, वातानुकूलित बंगल्यात बसून एक संस्थान चालवत असल्यासारखे केंद्रीय नेतृत्व थेट दिल्लीतून चालवले जात आहे, तर अनेक आमदारही काँग्रेसमध्ये नाराज असून त्यांना गुदमरल्यासारखे वाटत असल्याचा दावाही त्यांनी केला. गुजरात विधानसभेचे अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे पटेल यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.
आरोप करत ते म्हणाले की, ते वातानुकूलित बंगल्यात बसून एक संस्थान चालवत असल्यासारखे केंद्रीय नेतृत्व थेट दिल्लीतून चालवले जात आहे. इतर अनेक आमदारही काँग्रेसमध्ये नाराज असून त्यांना गुदमरल्यासारखे वाटत असल्याचा दावाही त्यांनी केला. आनंद जिल्ह्यातील खंभात मतदारसंघाचे प्रथमच आमदार असलेले पटेल यांनी मंगळवारी सकाळी गांधीनगरमध्ये गुजरात विधानसभेचे अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला, असे स्पीकर कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. चौधरी यांनी नंतर पत्रकारांना सांगितले की, त्यांनी पटेल यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
पटेल यांच्या राजीनाम्यामुळे १९२ सदस्य असलेल्या गुजरात विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ आता १६ वर आले आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पटेल यांनी खंभातमध्ये भाजपचे विद्यमान आमदार महेश रावल यांचा जवळपास ३७०० मतांनी पराभव केला होता. भाजपने १५६ जागा जिंकून राज्यात सत्ता कायम ठेवली आहे.
राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पटेल यांनी आपल्या या निर्णयासाठी काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यशैलीला जबाबदार धरले आणि परिस्थिती सुधारली नाही तर पक्षाचे आणखी काही आमदारही राजीनामा देऊ शकतात, असा दावा केला.