राहुल गांधींना 'ते' वक्तव्य भोवणार ? न्यायालयाने दिला 'हा' निकाल

2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटकातील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले होते
राहुल गांधींना 'ते' वक्तव्य भोवणार ? न्यायालयाने दिला 'हा' निकाल

मोदींवर आडनावाने टीका केल्याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना गुजरातमधील सुरत न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण 2019 च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित आहे. या शिक्षेमुळे राहुल गांधींच्या खासदारकीवर काही परिणाम होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. 

सर्व चोर मोदी नावाचे का असतात ? या लोकसभा निवडणुकीतील वक्तव्याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना आज दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. गुजरातच्या सुरत जिल्हा न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटकातील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले होते. यानंतर गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी दावा केला की, या विधानामुळे संपूर्ण मोदी समाजाचा अपमान झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून हा खटला न्यायालयात सुरू होता. आता लोकसभा निवडणुकीला वर्षभर उरले असताना निकाल लागला आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांनाही जामीन मंजूर केला आहे. तसेच ही शिक्षा पुढील ३० दिवस लागू होणार नाही. या कालावधीत त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकारही देण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 499, कलम 500 अंतर्गत राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकारच्या फौजदारी मानहानीच्या प्रकरणांमध्ये कमाल दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.

ब्रिटिशांच्या काळात हे कलम रद्द करण्यासाठी याचिकाही दाखल झाल्या होत्या. पण 2016 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्याला गुन्हेगारी ठरवण्यास नकार दिला. या प्रकरणात दोन वर्षांच्या शिक्षेनंतर राहुल गांधी यांच्या उमेदवारीवर परिणाम होणार का, अशीही चर्चा आहे. लोकप्रतिनिधीला कोणत्याही न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा दिल्यास त्याचे सदस्यत्व धोक्यात येते. मात्र न्यायालयाने राहुल गांधींना 30 दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत त्यांना जामीन मिळाल्यास त्यांच्या सदस्यत्वावर कोणताही परिणाम होणार नाही. एकीकडे राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे देशाची संसद दोन आठवडे बंद आहे. परदेशात जाऊन भारताचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

logo
marathi.freepressjournal.in